You are currently viewing शिवसेनेच्या माध्यमातून आंब्रड येथे विकास कामांचा धडाका

शिवसेनेच्या माध्यमातून आंब्रड येथे विकास कामांचा धडाका

कुडाळ-

खा. विनायक राऊत,आ. वैभव नाईक यांची उपस्थिती आंब्रड येथील श्री. हनुमान वाचनालय व ग्रंथसंग्रालयाला आमदार वैभव नाईक यांच्या आमदार स्थानिक विकास निधीतून दोन संगणक संचांचे वाटप आज करण्यात आले.तसेच आंब्रड भगवती मंदिर येथे प्रवेशद्वार बांधणे, आंब्रड भगवती मंदिर रस्ता डांबरीकरण करणे, टेंबवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे, मोगरणेवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे, दळवीवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे या कामांची भूमिपूजने खासदार विनायक राऊत,आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. यावेळी आंब्रड येथे शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली. खासदार विनायक राऊत,आमदार वैभव नाईक यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत पक्ष संघटना वाढीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच गावातील इतर विकास कामांचा आढावा घेत उर्वरीत कामे येत्या काळात मार्गी लावण्याची ग्वाही खासदार,आमदार यांनी दिली आहे. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते,तालुकाप्रमुख राजन नाईक, तालुका संघटक बबन बोभाटे, कुडाळ उपसभापती जयभारत पालव, विभाग प्रमुख विकास राऊळ, सरपंच विठ्ठल तेली, उपसरपंच विजय परब, आबा मुंज, प्रवीण भोगटे, संदीप परब, दिनकर परब, सागर वाळके, निशांत तेरसे, सीताराम दळवी, तात्या मुंज, तात्या आंगणे, विजय परब, जया परब, आदींसह शिवसेना पदाधिकारी, व शिवसैनिक उपस्थित होते.

अभिप्राय द्या..