You are currently viewing सावंतवाडी शहरातील जिओच्या जीवघेण्या खड्डयांत राष्ट्रवादीचे मेणबत्ती आंदोलन…

सावंतवाडी शहरातील जिओच्या जीवघेण्या खड्डयांत राष्ट्रवादीचे मेणबत्ती आंदोलन…

सावंतवाडी /-

जिओ लाईन साठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यांमध्ये पक्का भराव न टाकल्याने पावसामुळे खड्डे पडले आहेत. ते खड्डे सत्ताधाऱ्यांना दिसून येण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आज त्या खड्ड्यांमध्ये मेणबत्ती लावून अनोख्या प्रकारे आंदोलन करून दिवाळी साजरी केली. हे आंदोलन तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांच्या नेतृत्वाखाली सालईवाडा येथे करण्यात आले.

राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शहराध्यक्ष देवेंद्र टेंमकर, हिदायतुल्ला खान, दर्शना बाबर-देसाई, संतोष जोईल, असलम खतिब, आगोस्तिन फर्नांडिस, बावतीस फर्नांडिस, इफ्तिकार राजगुरू, प्रथमेश चोडणकर, नियाज शेख, जहिरा ख्वाजा, सावली पाटकर आदी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..