You are currently viewing वेंगुर्ला तालुका शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा ९नोव्हेंबरला.

वेंगुर्ला तालुका शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा ९नोव्हेंबरला.

वेंगुर्ला /-

वेंगुर्ले
वेंगुर्ले तालुका शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा मंगळवार ९ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता वेंगुर्ला तालुका शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाजवळील साईमंगल कार्यालय येथे संपन्न होणार आहे, अशी माहिती वेंगुर्ले तालुका शिवसेना प्रमुख यशवंत उर्फ बाळू परब यांनी दिली. या मेळाव्यासाठी महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे खासदार विनायक राऊत, सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर,सावंतवाडी मतदार संघाचे आमदार दिपक केसरकर, शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पडते, सावंतवाडी विधानसभा मतदार संघ संपर्क प्रमुख शैलेश परब, सिंधुदुर्ग जिल्हा महिला संघटक जान्हवी सावंत, युवासेना जिल्हाधिकारी मंदार शिरसाट या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत.
या मेळाव्यास वेंगुर्ले तालुक्यातील सर्व शिवसेना पदाधिकारी तसेच कार्यकर्ते महिला, युवासेना व शिवसैनिक यांनी वेळीच उपस्थित रहावे,असे आवाहन शिवसेना तालुका प्रमुख यशवंत उर्फ बाळू परब यांनी केले आहे.

अभिप्राय द्या..