You are currently viewing परुळे ग्रामपंचायत व ग्रामसंघ यांच्या संयुक्त दीपावली महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद.;बच्चे कंपनी किल्ले बनवणे व नरकासुर बनविण्यात व्यस्त..

परुळे ग्रामपंचायत व ग्रामसंघ यांच्या संयुक्त दीपावली महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद.;बच्चे कंपनी किल्ले बनवणे व नरकासुर बनविण्यात व्यस्त..

परुळे /-

परुळेबाजार येथे 30 ऑक्टोबर ते आज 2 नोव्हेंबर 2021 या चार दिवसाच्या कालावधीत ग्रामपंचायत परुळेबाजार, सावित्री महिला ग्रामसंघ परुळेबाजार, गवाण आनंदी ग्रामसंघ कर्ली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या दिवाळी महोत्सवास चांगला प्रतिसाद लाभला.
दीपावली निमिताने परुळे गावातील महिला बचत गटाच्या उत्पादित विविध वस्तू, उत्पादने यांना बाजारपेठ मिळावी या हेतूने ग्रामपंचायत व ग्रामसंघ यांनी संयुक्त पणे या महोत्सवाचे आयोजन केले होते. या महोस्तवात महिला बचत गट यांनी आपल्या उत्पादित वस्तूंचे स्टोल लावले होते. यास ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद लाभला. सहा बचत गटांनी प्रदर्शनात सहभाग घेतला. दरम्यान दीपावलीच्या आगमनाची बच्चे कंपनी कडून तयारी सुरू झाली आहे. किल्ले बनविणे, नरकासुर तयार करणे यामध्ये बच्चे कंपनी व्यस्त आहे. कोरोना च्या प्रभावा मूळे गेले दोन वर्षे सर्व सण उत्साहात साजरे करता आले नाहीत. आता प्रभाव कमी झाला त्यामुळे निर्बंध शिथिल झाले आहेत. त्यातच शाळांना सुट्टी पडल्यामुळे मुले दीपावली ची तयारी करीत आहेत.

अभिप्राय द्या..