You are currently viewing मोर्ले कुंबरी शेती बाबत सर्वतोपरी सहकार्य निवासी जिल्हाधिकारी यांचे आश्वासन:,सभापती डॉ.अनिशा दळवी यांनी केली होती मागणी.

मोर्ले कुंबरी शेती बाबत सर्वतोपरी सहकार्य निवासी जिल्हाधिकारी यांचे आश्वासन:,सभापती डॉ.अनिशा दळवी यांनी केली होती मागणी.

दोडामार्ग-

सिंधुदुर्ग जिल्हा परीषद आरोग्य व शिक्षण समिती सभापती डॉ.अनिषा दळवी यांनी जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांना दिलेल्या पत्राच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांनी दोडामार्ग तालुक्यातील मोर्ले ग्रामवासियांकडून करण्यात येणाऱ्या कुंबरी शेतीबाबत एका विशेष बैठक आयोजित केली होती.निवासी जिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत सकारात्मक चर्चा होवून मोर्ले ग्रामस्थांना वाघोत्रे चंदगडच्या धर्तीवर कुंबरी शेतीच्या जमिनीबाबत सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन देण्यात आलेले आहे.

बैठकीस सभापती डॉ.अनिषा दळवी यांचेसह सावंतवाडी प्रांत श्री.प्रशांत पानवेकर,सावंतवाडी उपवनरक्षक,मोर्ले उपसरपंच श्री.पंकज पांडुरंग गवस,तंटामुक्ती अध्यक्ष विजय पांडुरंग रेडकर,वाघोत्रे चंदगड माजी सरपंच मारुती तुकाराम गावडे,मोर्ले ग़्रामस्थ संतोष शंकर गवस ॲड.विद्यानंद पांडुरंग सांगवीकर आदी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..