You are currently viewing कणकवली नगरपंचायतच्या पुढाकाराने दिव्यांगाना ऍक्टिव्हा गाड्या प्रधान..

कणकवली नगरपंचायतच्या पुढाकाराने दिव्यांगाना ऍक्टिव्हा गाड्या प्रधान..

नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते ऍक्टिव्हा दुचाकी सुपूर्द.

कणकवली /-

कणकवली नगरपंचायतच्या उत्पन्नातील 5 % दिव्यांग कल्याण निधीतून शहरातील दिव्यांग स्वप्नील काका बागवे याला नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते ऍक्टिव्हा दुचाकी प्रदान करण्यात आली. नगरपंचायत च्या उत्पन्नातील 5 टक्के निधी हा दिव्यांगांसाठी कल्याण निधी म्हणून वापरला जातो. याच निधीतून दिव्यांग स्वप्नील याला ही दुचाकी आज प्रदान करण्यात आली. स्वप्नील हा कणकवली शहरात सकाळी दूध विक्री करतो. त्यानंतर दिवसभर कांदे-बटाटे तसेच भाजी विक्री करून आपला उदरनिर्वाह करतो. स्वप्नीलच्या या धडपडीला आता कणकवली नगरपंचायतने दिलेल्या दुचाकीमुळे वेग येणार आहे. नगरपंचायतने दिलेल्या दुचाकीबद्दल स्वप्नीलने नगराध्यक्ष नलावडे व प्रशासनाचे आभार मानले. यावेळी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, आरोग्य सभापती संजय कामतेकर, माजी उपनगराध्यक्ष किशोर राणे, माजी नगरसेवक बंडू गांगण, बाळा सावंत, किशोर धुमाळे आदी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..