You are currently viewing लवकरच जाणवली नदीवरील गणपती साणा येथे ब्रिज कम बंधारा होणार.;राष्ट्रवादीनेते तथा नगरसेवक अबिद नाईक यांची जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली मागणी..

लवकरच जाणवली नदीवरील गणपती साणा येथे ब्रिज कम बंधारा होणार.;राष्ट्रवादीनेते तथा नगरसेवक अबिद नाईक यांची जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली मागणी..

तातडीने तपासून प्रस्ताव सादर करण्याचे आदेश पाटील यांनी अधीक्षक अभियंत्यांना दिले..

कणकवली /-

शहरातील जाणवली नदीवरील गणपती साणा येथे ब्रिज कम बंधारा बांधण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी नेते तथा कणकवलीचे नगरसेवक अबिद नाईक यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली आहे.याप्रकरणी तातडीने तपासून प्रस्ताव सादर करण्याचे आदेश श्री.पाटील यांनी अधीक्षक अभियंत्यांना दिले आहेत.
कणकवली शहरातील लोकांना पलीकडे जाण्यासाठी, शेतीसाठी तसेच पाणीसाठ्याच्या दृष्टीने हा बंधारा महत्त्वपूर्ण आहे. गेली अनेक वर्ष हा बधारा व्हावा अशी मागणी करण्यात येत आहे. शेतीसोबतच या भागातील जलस्त्रोतांच्या पाणी पातळीत या बंधाऱ्यामुळे वाढ होणार आहे. तरी याबाबत तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी त्यांनी केली.
या मागणीची दखल घेत जलसंपदामंत्र्यांनी तातडीने अधीक्षक अभियंत्यांना याप्रकरणी तपासून प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले आहेत. पुढील आठवड्यात या प्रकरणीचा प्रस्ताव सादर होणार असल्याची माहिती नाईक यांनी दिली.

अभिप्राय द्या..