You are currently viewing कलेशी दोस्ती करा, ती कसं जगायचं ते सांगेल.;बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये दिवाळी निमित्त आयोजित कला प्रदर्शनात संदीप साळसकर उद्गगार.

कलेशी दोस्ती करा, ती कसं जगायचं ते सांगेल.;बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये दिवाळी निमित्त आयोजित कला प्रदर्शनात संदीप साळसकर उद्गगार.

कुडाळ /-

कलेशी दोस्ती करा, कला कसं जगायचं ते सांगेल, कलावंत कधीच एकटा नसतो. तो कला निर्मितीचा आनंद घेत जगत असतो. छोट्या-छोट्या सादकरणातूनच कलाकाराची कला आकारास येत असते” असे उद्गार पाट हायस्कूल चे कला शिक्षक श्री संदीप साळसकर सर यांनी काढले ते बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये दिवाळी निमित्त आयोजित कला प्रदर्शन कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. त्यांनी आपल्या पुढील मनोगतामध्ये “आपली कला प्रकाशात आणण्याचे विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावे. शिक्षकांचे मार्गदर्शन घ्यावे; यातूनच आपल्यातील उद्याचा कलावंत घडवू शकतो” .असे सांगत कला प्रदर्शनांमध्ये विद्यार्थ्यांनी बनविलेले आकाश कंदील विविध ग्रीटिंग्स, शोपीस, खाऊचे पदार्थ, तोरणं, पोस्टर्स, रांगोळी यांच्या कलात्मकतेचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे कौतुक करत उपक्रमांना शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत दैनिक तरुण भारतचे आवृत्ती प्रमुख शेखर सामंत, बॅरिस्टर नाथ पै महिला व रात्र महाविद्यालयाचे प्राचार्य अरुण मर्गज ,सीबीएससी सेंट्रल स्कूलच्या मधुरा इंसुलकर, बॅ. नाथ पै ज्युनियर कॉलेजचे अर्जुन सातोस्कर ,संस्था चेअरमन उमेश गाळवणकर ,बीएड महाविद्यालयाचे प्राचार्य परेश धावडे, नर्सिंग महाविद्यालयाच्या उपप्राचार्य कल्पना भंडारी, बॅरिस्टर नाथ पै सेंटर स्कूलचे कला टीचर प्रसाद कानडे, योगेश येरम,प्रणित पालव, संस्थेच्या एच. आर.ओ.पियुशा प्रभूतेंडोलकर इत्यादी उपस्थित होते. दीपप्रज्वलन करून या कला प्रदर्शनाचे प्रमुख अतिथी संदीप साळसकर सर व अध्यक्ष शेखर सामंत यांच्या शुभहस्ते दीप प्रज्ज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाला शुभेच्छा देताना आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये शेखर सामंत यांनी शाळा, महाविद्यालय कलानिर्मितीच्या पाठशाळा व्हाव्यात. मुलांच्या सुप्त गुणांना प्रकाशात आणण्याचे काम शाळाच उत्तम रित्या करू शकतात‌. त्यादृष्टीने बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचे संस्था विविध स्तुत्य उपक्रम हाती घेत असते; त्याचा आनंद घेण्याची संधी आपणास मिळाल्याने आपण समाधानी आहोत .असे उद्गार त्यांनी काढले व दिवाळीनिमित्त आयोजित या कला प्रदर्शनातील विविध हस्तकला प्रकारांची त्यांनी मुक्तकंठाने स्तुती- कौतुक करत सगळ्यांना शुभेच्छा दिल्या. कला प्रदर्शनाचे व रांगोळी प्रदर्शनाचे शेखर सामंत व संदीप साळसकर यांच्या शुभहस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आले .या प्रदर्शनाच्या मांडणीसाठी कलाशिक्षक प्रसाद कानडे योगेश येरम, प्रणित पालव, संतोष पडते, गजानन टारपे सुनील गोसावी इतर शिक्षकांनी मोलाची मदत केली.यावेळी विविध अभ्यासक्रमाचे विद्यार्थी शिक्षक उपस्थित होते.

अभिप्राय द्या..