You are currently viewing नाटककार मधुसूदन कालेलकर बहुउदेशीय सभागृहाचे उदघाटन लवकरच..

नाटककार मधुसूदन कालेलकर बहुउदेशीय सभागृहाचे उदघाटन लवकरच..

वेंगुर्ला /-
वेंगुर्ले येथे उभारण्यात आलेले नाटककार मधुसूदन कालेलकर बहुउदेशीय सभागृहाचे उद्घाटन कार्यक्रम दोन दिवसीय विविध कार्यक्रमांनी नोव्हेंबर महिन्यात घेण्याचा निर्णय वेंगुर्ले नगर परिषदेच्या विशेष सभेत घेण्यात आला.रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव असे सर्वात मोठे असलेल्या या सभागृहाचे उद्घाटन राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते होणार आहे.वेंगुर्ला नगरपरिषदेची विशेष सभा श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेस उपनगराध्यक्षा शितल आंगचेकर, मुख्याधिकारी डॉ. अमितकुमार सोंडगे, गटनेते सुहास गवंडळकर, प्रकाश डिचोलकर, नगरसेवक प्रशांत आपटे, धर्मराज कांबळी, नागेश गावडे, स्नेहल खोबरेकर, श्रेया मयेकर, साक्षी पेडणेकर, पूनम जाधव, शैलेश गावडे, विधाता सावंत आदी उपस्थित होते.
वेंगुर्ले नगरपरिषदेच्या गेल्या पाच वर्षाच्या कारकिर्दीतील सर्वात मोठे असलेले काम म्हणजे नाटककार मधुसूदन कालेलकर बहुउदेशीय सभागृहाचे काम पूर्ण झाले आहे. येत्या नोव्हेंबर मध्ये त्याचे लोकार्पण होणार आहे.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारकिर्दीत साडे सहा कोटी मंजूर झालेल्या या नाट्यगृहामध्ये ६५० खुर्च्या असून हा पूर्णपणे ए. सी हॉल आहे. हा उदघाटन कार्येक्रम विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असून दोन दिवसांचा अशा भव्यदिव्य असलेल्या या कार्यक्रमात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये डॉक्युमेंटरी चे सादरीकरण करण्यात येणार आहे. तसेच नाट्यगृहामध्ये कुर्ला ते वेंगुर्ला फिल्मचा प्रमोशन शो होणार आहे. मराठी नाटके आदी कार्यक्रम होणार आहेत.या सभेत अन्य विषयावरही चर्चा झाली.

अभिप्राय द्या..