You are currently viewing आडेली भटवाडी ते शंभूभवानी रस्त्याचे भूमिपूजन आमदार दिपक केसरकर यांच्या हस्ते संपन्न..

आडेली भटवाडी ते शंभूभवानी रस्त्याचे भूमिपूजन आमदार दिपक केसरकर यांच्या हस्ते संपन्न..

वेंगुर्ला /-


वेंगुर्ले तालुक्यात विविध प्रकल्प मंजूर केले आहेत.आडेली गावच्या विकासासाठी आज रस्ते विकास च्या बाबतीत तसेच अन्य सुविधांसाठी कटिबद्ध असल्याची माहिती आमदार दिपक केसरकर यांनी आडेली भटवाडी येथे दिली.मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर झालेल्या आडेली भटवाडी ते शंभूभवानी रस्त्याचे भूमिपूजन रविवारी आमदार दिपक केसरकर यांच्या हस्ते झाले.यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते,तालुकाप्रमुख यशवंत उर्फ बाळू परब,उपजिल्हाप्रमुख सुनिल डुबळे,माजी सभापती तथा पं. स.सदस्य सुनिल मोरजकर, शिवसेना शहरप्रमुख अजित राऊळ,आडेली सरपंचा प्राजक्ता मुंडये,उपसरपंच संतोष कासले,देवा कांबळी, माजी सरपंच प्रकाश गडेकर, सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत गडेकर, शिवसेना पदाधिकारी सचिन गडेकर,ग्रा.पं.सदस्य घन :श्याम नाईक,लीलाधर मांजरेकर, रामचंद्र आडेलकर,ग्रामसेवक अनिल चव्हाण,माजी सरपंच भारत धरणे,माजी तंटामुक्ती समिती अध्यक्ष नितीन मांजरेकर,तुषार कांबळी,प्रशांत मुंडये आदी उपस्थित होते.यावेळी पुढे बोलताना केसरकर म्हणाले की,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना कालावधीत जनतेची चांगली काळजी घेतली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा हा एकमेव आहे,जेथे आपण ग्रा.पं. नवीन इमारतीसाठी निधी दिला आहे.वेंगुर्ले तालुक्यात कृषी पर्यटन व अन्य मोठे विकासात्मक प्रकल्प मंजूर केले आहेत.आडेली गावच्या विकासासाठी आपण सदैव कटिबद्ध राहीन.येथील रस्त्याचे काम होणार असल्याने येथील ग्रामीण जनतेची मोठी सोय होणार आहे.यापुढे येथील जनता समृद्ध होण्यासाठी प्रत्येक गावामध्ये जाणार आहे,असेही त्यांनी सांगितले.कृषी व शेतकऱ्याच्या विकासाच्या दृष्टीने प्रयत्नशील राहणार आहे,असेही त्यांनी म्हटले.
यावेळी त्यांनी आमदार निधीतून येथे गणेशघाट साठी ३ लाख रुपये निधी देण्याचे जाहीर केले.
सर्वप्रथम आमदार दिपक केसरकर यांचा शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.तसेच संजय पडते,नवनिर्वाचित सरपंचा प्राजक्ता मुंडये,सर्पमित्र दिपक दुतोंडकर यांचाही सत्कार करण्यात आला.
यावेळी शिवसेना उपतालुकाप्रमुख उमेश नाईक,प्रविण गडेकर, गंगाधर गोवेकर, पुरुषोत्तम धरणे,मारुती वाघे,नारायण कासले,बाबल कानडे, रामा कोंडसकर,परशुराम वाघे, गौरव धुरी,ठाकूर,गौरव धुरी,राजन दुतोंडकर, दामोदर धुरी,अक्षय दुतोंडकर,अजित मार्गी,दिपक दुतोंडकर,रामचंद्र धुरी,सुरज सोनसुरकर, गणपत म्हारव, मोहन धुरी,सुनिल सोनसुरकर, दिनेश बिडिये, भारत कोंडसकर,मंदाकिनी परब,अशोक गावडे, संदिप कांबळी, रोहित कोंडसकर आदींसह बहुसंख्य महिला, ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी आयोजित कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन मांजरेकर व आभार सुनिल सोनसुरकर यांनी मानले.

अभिप्राय द्या..