You are currently viewing बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेच्या लसिकरण केंद्रामध्ये २०० पेक्षा अधिक लसिंचा टप्पा पार..

बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेच्या लसिकरण केंद्रामध्ये २०० पेक्षा अधिक लसिंचा टप्पा पार..

कुडाळ /-

नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये नर्सिंग महाविद्यालय आणि फिजिओथेरपी महाविद्यालय यांच्या सहकार्याने बॅ. नाथ पै जन्मशताब्दी निमित्त चेअरमन उमेश गाळवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली २५आॉक्टोबरला कोरोना लसीकरण केंद्र सुरू केले. त्या केंद्रांमध्ये एकाच महिन्यात २०० पेक्षा अधिक जणाना लस देण्यात आली .या प्रित्यर्थ केक कापून कर्मचाऱ्यांतर्फे आनंद व्यक्त करण्याचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला.यावेळी फिजिओथेरपी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.सुरज शुक्ला, डॉ.प्रगती शेटकर,नर्सिंग महाविद्यालयाच्या उप प्राचार्या सौ. कल्पना भंडारी, प्रा.ज्योती सकीन -तारी, प्रा‌.पल्लवी हरकुळकर,प्रा. प्रियांका माळकर, प्रा.वैजयंती नर,प्रा.पूजा म्हालटकर व विविध कर्मचारी प्राध्यापक उपस्थित होते.

अभिप्राय द्या..