You are currently viewing कुडाळ भैरववाडी येथे एस. टी. बस व कारमध्ये अपघात..

कुडाळ भैरववाडी येथे एस. टी. बस व कारमध्ये अपघात..

कुडाळ /-

कुडाळ शहरातील भैरववाडी येथे एस. टी. बस व कारमध्ये अपघात होऊन कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले या अपघातात एस. टी. बस स्लिप होऊन उभ्या असलेल्या कारवर जाऊन धडकली या परिसरातील एस. टी. बसचा हा तिसरा अपघात आहे.

कुडाळ शहरातील भैरववाडी येथे श्री देव भैरव मंदिर ते पंचायत समिती कार्यालयाच्या या परिसरामध्ये एस. टी. बसचा हा तिसरा अपघात आहे. यापूर्वी दोन एस. टी. बस स्लीप होऊनच अपघातग्रस्त झाले होते. दरम्यान आज (शनिवारी) पणजी ते कोल्हापूर अशी जाणारी एस. टी. बस भैरव मंदिर समोरील वळणावर आली त्याच दरम्यान त्या वळणाच्या बाजूला कार उभी होती बस चालकाने ब्रेक केल्यावर एस. टी. बस स्लिप होऊन उभ्या असलेल्या कारवर जाऊन धडकली यामध्ये कारचा मागील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला. या कारमध्ये कोणी नसल्यामुळे कोणालाही इजा झाली नाही पोलीस घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी अपघाताचा पंचनामा केला. या परिसरातील हा तिसरा अपघात असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून याबाबत उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

अभिप्राय द्या..