You are currently viewing पावशी येथे झाली चोरी ६३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी केला लांप्पास..

पावशी येथे झाली चोरी ६३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी केला लांप्पास..

कुडाळ /-

पावशी देऊळवाडी येथील रामदास वर्दम यांच्या घराचे कुलूप तोडून त्यांच्या बेडरूम मधील दोन लोखंडी पत्र्याच्या कपाटातील सोने, चांदीच्या दागिने व वस्तू सह रोख रक्कम मिळुन सुमारे ६३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. या घरफोडी प्रकरणी कुडाळ पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी कुडाळ येथील विवेक बोभाटे यांनी पोलीस ठाण्यात खबर दिली की, त्यांचे मामा रामदास वर्दम यांचे घर पावशी देऊळवाडी येथे असुन

ते कामानिमित्त त्यांच्या मुलग्याकडे मुंबईला गेले आहेत. या दरम्यान दि. २२ ते दि. २३ ऑक्टोबर या कालावधीत त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडलेले असल्याची माहिती त्यांचे शेजारी वैभव कुडतरकर यांनी वर्दम यांना दिली. त्यानंतर हो सर्व माहिती मामांनी बोभाटे यांना दिली.

सदरची माहिती मिळताच बोभाटे पावशी येथील मामाच्या घरी गेले असता घराचा मुख्य दरवाजाचे कुलुप तोडलेले होते. फक्त कडी लावुन ठेवण्यात आली होती.

त्यानंतर मुख्य दरवाजा उघडून हॉल मध्ये गेले असता हॉलमधील साहीत्य सुस्थितीत होते. परंतू बेडरूम मधील साहीत्य अस्ताव्यस्त व जमीनीवर पडलेले होते. तर तेथील दोन्हीही लोखंडी पत्र्याच्या कपटाचे दरवाजे कोणत्या हत्याराने तोडलेले होते.

त्यामुळे मामाने संपर्क साधला असता त्यांनी सांगितल्या कपाटातील साहीत्य तपासले असता या कपाटातील चॉकलेटी कपड्यातील सुमारे १० हजार पये सोन्याच्या कुड्यांचा जोड, १० हजार रुपये चांदीचे जूने ताम्हण, २ हजार चांदीची निरंजने, २ हजार चांदीची अत्तरदाणी, २ हजार चांदीची गुलाबदाणी, २ हजार टायटन कंपनीचे घड्याळ, ५०० रूपयांचा स्टीमर, ३ हजार रूपये किमंतीचे चार शर्ट, व चार पँट, २७ हजार ५०० रुपयांची रोख रक्कम असा मुद्देमाल मिळुन सुमारे ६३ हजार रूपयांची चोरी केल्याची तक्रार त्यांनी कुडाळ पोलिस ठाण्यात दिली. घटनास्थळी कुडाळ पोलिस मंगेश जाधव व दयानंद चव्हाण यांनी जात पंचनामा केला असून या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अभिप्राय द्या..