You are currently viewing वाहन अपघातात मृत्युस कारणीभुत ठरल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता..

वाहन अपघातात मृत्युस कारणीभुत ठरल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता..

कुडाळ /-

वेतोरे सबनीसवाडा येथे राहणारा अक्षय जयराम शिरोडकर याने आपल्या ताब्यातील दुचाकी वाहन कुडाळ ते वेंगुर्ले या रस्त्यावरून चालवित घेऊन जात असताना रस्त्याचे विशिष्ट परिस्थितीकडे दुर्लक्ष करून अविचाराने हयगयीने, निष्काळजीपणे व वेदरकारपणे दुसरा दुचाकी वाहन स्वार गंगेश राजाराम गोडे याच्या वाहनास धडक देऊन अपघात करून व्याचे गंभीर दुखापतीस व मृत्युस तसेच स्वतःस किरकोळ गंभीर दुखापतीस कारणीभुत झाल्यामुळे कुडाळ पोलीसांनी त्याच्याविरुध्द भा. द. वि. कलम ३०४ अ] २७९३३७३३८ व मो. वा. अधिनियम कलम १८४ प्रमाणे कुडाळ न्यायालयात गुन्हा दाखल केला. व्याकामी झालेल्या पुराव्यावरून सरकारी पक्ष आरोपी शिरोडकर यांचा गुन्हा शाबीत करू न शकल्यामुळे त्याची प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, कुडाळ श्रीम. अश्विनी जे. बचुलकर यांनी निर्दोष मुक्तता केली. आरोपीतर्फे अॅड. मिहिर भणगे, अॅड. तुषार भणगे, अॅड. स्वप्ना सामंत, अॅड. सुनिल माळवणकर व अॅड. मधुरा सबनीस यांनी काम पाहीले.

यातील हकीगत अशी की, श्री. सिध्देश शिवाजी मोंडकर यास दिनांक २०.१२.२०१७ रोजी असे समजले की, मथुरा आर्केड, पिंगुळी येथे दोन मोटरसायकलचा अपघात झालेला असून दोन्ही इसम जखमी झालेले आहेत. म्हणून त्याने प्रत्यक्ष जागेवर जाऊन जखमी इसमांना मित्राच्या मदतीने खाजगी रुग्णवाहिकेन्दारे इस्पितळात पोहोचविण्याची व्यवस्था केली. सदर तारखेस मंगेश राजाराम गोडे, रा. आंदुळे हा आपली दुचाकी घेऊन आंदुर्ल्याहून पिंगुळी येथे जात होता तर आरोपी अक्षय जयराम शिरोडकर हा कुडाळहून पिंगुळी येथे जात होता. वाटेत पिंगुळी येथील मथुरा आर्केडसमोर अपघात झाला. व्यात गंगेश राजाराम गोडे, रा. आंदुळे हा मृत्यु पावला. त्यामुळे आरोपी शिरोडकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

आरोपीतर्फे युक्तीवाद करताना अॅड. मिहिर भणगे यांनी न्यायालयाच्या असे निदर्शनास आणून दिले की, मयत गंगेश राजाराम गोडे हा मथुरा आर्केड येथे वॉचमन म्हणून कामास होता. तो पिंगुळीवरून आपल्या कामाच्या ठिकाणी जात असताना वाटेव मथुरा आर्केड येथे जाण्यासाठी अचानक उजव्या बाजूस वळला. त्यावेळी समोरुन येणाऱ्या आरोपी शिरोडकर याच्या दुचाकीची धड़क त्याच्या मोटरसायकलला लागली. आणि त्यामुळेच हा अपघात घडल्याचे पंचनाम्यावरूनही दिसून येणारे आहे. सरकारी पक्षातर्फे घेण्यात आलेल्या पाच साक्षीदारांच्या तोंडी पुराव्यावरुन गयत गंगेश राजाराम गोडे याचीच प्रथमदर्शनी चूक असल्याचे दिसून येत असल्याचेही निदर्शनास आणण्यात आले. या सर्व गोष्टीचा विचार करून प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, कुडाळ श्रीम. अश्विनी जे. बचुलकर यांनी आरोपी अक्षय जयराम शिरोडकर याची निर्दोष मुक्तता केली. आरोपीतर्फे अॅड. मिहिर भणगे, ॲड. तुषार भणगे, अॅड. स्वप्ना सामंत, अॅड. सुनिल माळवणकर व अॅड. मधुरा सबनीस यांनी काम पाहीले.

अभिप्राय द्या..