You are currently viewing मठ येथे कायदेविषयक जनजागृती शिबिर संपन्न

मठ येथे कायदेविषयक जनजागृती शिबिर संपन्न


वेंगुर्ला


जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्ग व तालुका विधी सेवा समिती वेंगुर्ले तर्फे आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रमातंर्गत मठ ग्रामपंचायत कार्यालय क्षेत्रातील स्वयंभू मंगल कार्यालय येथे कायदेविषयक जनजागृती शिबिर संपन्न झाले.
यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण समिती सचिव डी. बी. म्हालटकर, वेंगुर्ले दिवाणी न्यायाधिश के. के. पाटील, मठ सरपंच तुळशीदास ठाकूर, उपसरपंच निलेश नाईक, ऍड. अक्षता राऊळ, ग्रामसेवक विकास केळुसकर, यांच्यासह गावातील नागरिक,महिला, ग्रा. पं. कर्मचारी उपस्थित होते.समाजातील दुर्बल घटकांना मोफत कायदेविषयक सहाय्य उपलब्ध व्हावे यासाठी हे कायदेविषयक जनजागृती शिबिर असल्याचे हांडे यांनी सांगून नागारिकांचे हक्क, अधिकार. महिलांचे हक्क याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. स्वागत मठ सरपंच तुळशीदास ठाकूर, सुत्रसंचालन ऍड. अक्षता राऊळ, तर आभार ग्रामसेवक विकास केळुसकर यांनी मानले.

अभिप्राय द्या..