कणकवली /-

दरवर्षी २४ डिसेंबर रोजी होणारी नाथ पै एकांकिका स्पर्धा यावर्षीही संस्थेने जाहीर केली आहे. कोरोना काळातील सरकारचे नियम अमलात आणून ही स्पर्धा घेतली जाईल. गतवर्षी संस्थेने नाथ पै एकांकिका लेखन स्पर्धा आयोजित केली होती. त्या स्पर्धेतील शालेय गटातील ४ व खुल्या गटातील ६ पारितोषिक विजेत्या एकांकिका व प्रथितयश लेखकांच्या शालेय गटातील ३ व खुल्या गटातील १७ एकांकिकांमधील एकांकिका सादर करणाऱ्या संघांना प्राधान्य देण्यात येईल. या व्यतिरिक्त अन्य एकांकिकांही सादर करता येतील. या स्पर्धेत शालेय गटात कमाल १० एकांकिका तर खुल्या गटात कमाल १५ एकांकिकांना प्रवेश देण्यात येईल.

या स्पर्धेत खुल्या गटासाठी अनुक्रमे ₹१५,०००, ₹१०,००० व ₹७,००० तर शालेय गटासाठी ₹५०००, ₹३००० वर २००० अशी सांघिक रोख पारितोषिके, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येते. तर अभिनय स्त्री-पुरुष, दिग्दर्शन, नेपथ्य यासाठीही रोख पारितोषिके, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र स्वतंत्रपणे देण्यात येतील. स्पर्धेत एकूण ६० हजार रकमेची पारितोषिके दिली जाणार आहेत.

एकांकिका स्पर्धा कणकवली येथे दिनांक २५ डिसेंबर ते २९ डिसेंबर, २०२१ या कालावधीत घेतली जाईल. स्पर्धेची प्रवेश फी दोन्ही गटासाठी ₹५००/- एवढी असून स्पर्धेचा प्रवेश अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख ७ डिसेंबर २०२१ पर्यंत आहे. अधिक माहितीसाठी संस्थेचे कार्यवाह शरद सावंत यांच्या ९४२२५८४०५४ या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेचे कार्याध्यक्ष ऍड. एन. आर. देसाई यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page