You are currently viewing आज होणार कणकवली नगरपंचायत सभापती निवड..

आज होणार कणकवली नगरपंचायत सभापती निवड..

कणकवली /-

कणकवली नगरपंचायत विषय समिती सभापतीपदी आज निवड होत असून पीठासीन अधिकारी म्हणून प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान आज नगरपंचायतच्या विशेष सभेत होणाऱ्या विषय समिती सभापती पदासाठी सत्ताधारी गटाच्या ऍड. विराज भोसले, संजय कामतेकर, उर्वी जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती खास सूत्रांकडून मिळत आहे. बांधकाम सभापती पदासाठी ऍड. विराज भोसले, आरोग्य सभापतीपदी संजय कामतेकर, महिला बालकल्याण सभापतीपदी उर्वी जाधव यांच्या नावावर पक्षश्रेष्ठींनी मोहोर उमटवली असल्याचे खास सूत्रांकडून समजत आहे. नामनिर्देशन दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत दाखल करण्यात येणार असून दुपारी सव्वादोन वाजल्यानंतर विषय समिती सभापती निवडीची अधिकृत घोषणा पीठासीन अधिकारी वैशाली राजमाने करणार आहेत.

अभिप्राय द्या..