You are currently viewing वेत्ये येथे आज व उद्या जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन..

वेत्ये येथे आज व उद्या जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन..

सावंतवाडी /-

श्री कलेश्वर कला क्रीडा मंडळ वेत्ये आयोजित जिल्हास्तरीय निमंत्रितांची भजन स्पर्धा दि. 12 व 13 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7.30 वाजता श्री देव कलनाथ मंदिर वेत्ये येथे आयोजित करण्यात आली आहे. तरी भजन रसिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले. स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक 5,555 रुपये, द्वितीय 3,333 रुपये, तृतीय 2,222 रुपये, उत्तेजनार्थ प्रथम व द्वितीय 1,111 रुपये तसेच उत्कृष्ट गायक, हार्मोनियम वादक, पखवाजवादक, तबलावादक, झान वादक आणि कोरस यांनाही बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. दरम्यान, मंगळवारी 12 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7.30 वाजता रवळनाथ प्रासादिक भजन मंडळ-पिंगुळी, रात्री 8.17 वाजता इसवटी प्रासादिक भजन मंडळ-मातोंड, रात्री 9 वाजता इसवटी पंचदेवी प्रासादिक भजन मंडळ-न्हावेली, रात्री 9.45 वाजता दाळकर प्रासादिक भजन मंडळ-तळवडे, रात्री 10.30 वाजता शिक्षक कलामंच-कुडाळ, रात्री 11.15 वाजता स्वराभिषेक भजन मंडळ-मणेरी यांचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे. बुधवारी 13 रोजी सायंकाळी 7 वाजता सनामदेव प्रासादिक भजन मंडळ-सांगेली, 7.50 वाजता सद्गुरू प्रासादिक भजन मंडळ-तुळस, रात्री 8.30 वाजता स्वरधारा प्रासादिक भजन मंडळ-तांबोळी, रात्री 9.15 वाजता निवजेश्वर प्रासादिक भजन मंडळ निवजे, रात्री 10 वाजता स्वरधारा प्रासादिक भजन मंडळ-डिगस, रात्री 10.45 वाजता स्वामी समर्थ प्रासादिक भजन मंडळ-कलंबिस्त, रात्री 11.30 वाजता दत्तगुरू प्रासादिक भजन मंडळ वैभववाडी यांच्या दमदार भजनांचा कार्यक्रम होणार आहे. तरी भजन रसिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन, श्री कलेश्वर कला क्रीडा मंडळ व्यत्ये यांनी केले आहे.

अभिप्राय द्या..