You are currently viewing नैतिकता वेशिला टांगलेल्या राजन जाधव आणि प्राजक्ता प्रभू यांनी आपली पायरी ओळखून बोलावे.;नेरूर शाखाप्रमुख बाळा पावसकर.

नैतिकता वेशिला टांगलेल्या राजन जाधव आणि प्राजक्ता प्रभू यांनी आपली पायरी ओळखून बोलावे.;नेरूर शाखाप्रमुख बाळा पावसकर.

कुडाळ /-

शिवसेनेच्या आणि आरक्षणाच्या जिवावर सभापती झालेल्या राजन जाधव यांनी आपली पातळी सोडून बोलू नये. ज्या आमदार वैभवजी नाईक यांनी तुम्हाला सभापती पदाच्या खुर्चीवर बसवले, त्यांच्याशीच तुम्ही बेईमान झालात. सभापती झालात म्हणजे आकाशाला हात लावल्यासारखे तुमचे वागणे होते, हे सर्वज्ञात आहे. पावशी गावच्या एका वाडी पुरते मर्यादित असलेले तुम्ही…! शिवसैनिक आणि शिवसैनिकांच्या जिवावर तुम्ही नावारूपास आलेले आहात हे विसरू नका. शिवसेनेचे सभापती असतानाही राणे समर्थकांची तळी उचलणारे तुम्ही… तुम्ही आम्हाला काय शिवसेना शिकवणार. आमदारांनी पावलोपावली अपमान केलात असं तुम्ही म्हणालात, मुळात शिवसेनेच्या जिवावर आणि आमदार वैभव नाईक यांच्या आशीर्वादाने मिळालेल्या मानसन्मानाला तुम्ही जागला नाहीत ही शोकांतिका आहे. कट्टरता रक्तात असावी लागते. जो आमचा होऊ शकला नाही, तो भाजपचा काय होणार?

प्राजक्ता प्रभू म्हणतात, आमदारांनी काम केली नाहीत, निधी दिला नाही. अहो प्रभू मॅडम, तुम्ही घरातून बाहेर पडलातच नाही, मतदारसंघात फिरकलाच नाहीत तर काम दिसतील कशी? आज तुमच्या मतदारसंघात वालावल ही तुमच्या गावाची ग्रामपंचायत सोडली तर कवठी, चेंदवण आणि हुमरमळा या तिन्ही ग्रामपंचायती शिवसेनेच्या आहेत. आमदारांनी निधी दिला, कामं केली म्हणुनच लोकांनी शिवसेनेकडे ग्रामपंचायती निवडून दिल्या. मुळात तुम्ही स्वताचा स्वार्थ साधण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश केला. सभापती पदाची स्वप्नं पडत असल्यामुळेच हा प्रवेश झाला. पक्षापेक्षा स्वताचा स्वार्थ तुम्हाला जास्त महत्त्वाचा होता.

ज्या शिवसेनेमुळे तुम्ही नावारूपास आलात, त्याच पक्षाशी बेईमान व्हायला लाज वाटली पाहिजे होती. तुमच्यात हिम्मत असेल तर पंचायत समिती सदस्य पदाचा राजीनामा द्या आणि निवडून येऊन दाखवा… हे तुम्हाला तिघांनाही या बाळा पावसकरचे आव्हान आहे.

अभिप्राय द्या..