You are currently viewing कुडाळ तालुक्यातील शिक्षकांचा शिक्षक भारती संघटनेत प्रवेश!

कुडाळ तालुक्यातील शिक्षकांचा शिक्षक भारती संघटनेत प्रवेश!

कुडाळ /-

कुडाळ तालुक्यातील १४ शिक्षकांनी शिक्षक भारतीच्या कार्यप्रणालीने प्रेरित होऊन माणगाव – कुडाळ येथे शिक्षक भारती संघटनेत जाहीर प्रवेश केल्याची माहिती
शिक्षक भारती सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संतोष पाताडे यांनी दिली.
शिक्षक श्री. नितीन गायकवाड, श्री. कृष्णा पानझाडी,श्री. विनायक हारगे, श्री. शशिकांत डांगरे, श्री. चेतन विल्हेकर, श्री. माधव थोटे, श्री. अमोल चेपूरवार,श्री. गंगाधर पवार, श्री. महेश लांडगे, श्री. वालाजी पाडवी,श्री. संजीव चौरे ,श्रीम.स्वप्नाली शिंदे, श्रीम. सुरेखा शिंदे यांनी प्रवेश केला.
याप्रसंगी गेल्या चार वर्षातील शिक्षक भारतीच्या कामकाजाचे अवलोकन करून ही संघटना शिक्षकांच्या प्रश्नांसाठी कोणताही गाजावाजा न करता प्रामाणिकपणे लढा देणारी जिल्ह्यातील संघटना असल्याने शिक्षकांचे प्रश्न शिक्षक भारतीच संघटना सोडवू शकते असे मत व्यक्त केले. तसेच जिल्हाध्यक्ष श्री. संतोष पाताडे यांनी प्रवेशकर्त्या शिक्षकांना प्रत्येक समस्या सोडवण्याची ग्वाही दिली. तसेच कुडाळ कार्याध्यक्ष श्री. योगेश देशमुख यांचे विशेष अभिनंदन केले. याप्रसंगी श्री. संतोष कोचरेकर, श्री. विनेश जाधव, श्री. दिनकर शिरवलकर उपस्थित होते.

अभिप्राय द्या..