You are currently viewing सावंतवाडी शहरवासियानसाठी पालिकेच्या दवाखान्यात लसीकरणाची सुविधा उपलब्ध.;आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर यांचे आवाहन

सावंतवाडी शहरवासियानसाठी पालिकेच्या दवाखान्यात लसीकरणाची सुविधा उपलब्ध.;आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर यांचे आवाहन

..

सावंतवाडी

सावंतवाडी शहरवासियानसाठी नगरपालिकेच्या दवाखान्यात कोव्हीशिल्ड डोस उपलब्ध करून देण्यात आले असून, ज्या नागरिकांनी अद्याप लस घेतली नाही. त्यानी त्या ठिकाणी जाऊन लस घ्यावी असे आवाहन आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर यांनी केले आहे. यावेळी मोबाईल आणि आधार कार्ड सोबत आणण्याचे देखील त्यांनी सांगितले आहे. शहरातील नागरिकांसाठी लसीकरणाची वेगळी सोय उपलब्ध व्हावी यासाठी नगराध्यक्ष संजू परब यांनी पाठपुरावा केला होता. त्याला यश आले असून, दिनांक ८ ऑक्टोंबर पासून सावंतवाडी नगरपालिकेच्या दवाखान्यात लस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नगराध्यक्ष संजू परब यांनी केलेल्या पाठपुराव्याला नगरसेवक यांनी देखील सहकार्य केले होते.

अभिप्राय द्या..