You are currently viewing शिवसेनेच्या वतीने आज कणकवलीत पैठणी स्पर्धेचे आयोजन..

शिवसेनेच्या वतीने आज कणकवलीत पैठणी स्पर्धेचे आयोजन..

कणकवली /-

शिवसेना कणकवली तालुका नवरात्रोत्सव 2021 मधे आज रविवार दि.10 ऑक्टोबर रोजी जानवली जिल्हा परिषद विभागाच्या वतीने भव्य पैठणी स्पर्धेचे संध्याकाळी 6 वाजता आयोजन करण्यात आले आहे. यावेळी प्रथम क्रमांकाला आकर्षक पैठणी व सन्मानचिन्ह, व्दितीय क्रमांकाला दोन आकर्षक पर्स व सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांकाला एक आकर्षक पर्स व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना विशेष भेटवस्तु यावेळी देण्यात येणार आहेत.

या पैठणी स्पर्धेत सहभागी होण्यास ईच्छुक महिला स्पर्धकांनी प्रतिक्षा साटम (8788038233), लतिका म्हाडेश्वर (9730365017), वैदेही गुडेकर (7057959038), शोभा बागवे (8408076763), सानिका राणे (7507705637) यांचेकडे संध्याकाळी 5 वाजेपर्यंत नाव नोंदणी करावी हि नम्र विनंती.

अभिप्राय द्या..