You are currently viewing काँग्रेसच्या वतीने दिवंगत आबा मुंज यांना वाहनात येणार श्रद्धांजली…

काँग्रेसच्या वतीने दिवंगत आबा मुंज यांना वाहनात येणार श्रद्धांजली…

कुडाळ/-

कुडाळ तालुका काँग्रेसच्या वतीने मंगळवार दिनांक १२ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० वाजता अनंत मुक्ताई मंगल कार्यालय कुडाळ येथे काँग्रेसचे अध्यक्ष दिवंगत आबासाहेब मुंज यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कार्यक्रम आयोजित केला आहे.तरी सर्वानी उपस्थित राहावे,असे आवाहन काॅग्रेसचे कुडाळ प्रभारी तालुका अध्यक्ष अभय शिरसाट यांनी केले आहे.

कुडाळ तालुका काँग्रेसचे अध्यक्ष दिवंगत आबासाहेब मुंज यांचे अकाली निधन झाले .त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात कांग्रेस पक्षाचा विचार जनमाणसात कसा पोहोचेल याचा विचार केला . काँग्रेस पक्षाच्या खडतर प्रवासात काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहीले. अशा या महान व्यक्तीचे अकाली निधन झाल्यामुळे काँग्रेस पक्षाची मोठी हानी झाली आहे.तरी त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो व त्यांच्या सर्व कुटुंबियांना या दुःखातून बाहेर पडण्याची ताकत ईश्वर आणि देव यासाठी कुडाळ तालुका काँग्रेसच्या वतीने मंगळवार दिनांक १२ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० वाजता अनंत मुक्ताई मंगल कार्यालय कुडाळ येथे श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित केला आहे. तरी सर्व काँग्रेस प्रेमी आबासाहेब मुंज प्रेमी यांनी उपस्थित राहावे. अशी विनंती अभय शिरसाट यांनी केली .

अभिप्राय द्या..