You are currently viewing कुडाळ शहरात स्थानिक आणि परप्रांतिय भाजी विक्रत्यामध्ये फ्री स्टाईल…

कुडाळ शहरात स्थानिक आणि परप्रांतिय भाजी विक्रत्यामध्ये फ्री स्टाईल…

कुडाळ /-

कुडाळ गवळदेव नजीक भाजीविक्रेत्या करणाऱ्यां स्थानिक आणि परप्रांतियामध्ये मारामारी झाल्याची घटना घडली आहे याबाबत पोलिसांपर्यंत हे प्रकरण गेले मात्र उशिरापर्यंत याबाबत पोलिस ठाण्यात कोणतीही नोंद नव्हती.
कुडाळ शहरातील गवळदेव मंदिरानजीक बीएसएनएल कार्यालयासमोर भाजी विक्री करणारे स्थानिक व परप्रांतीय व्यवसायिक आहेत. गेले २ वर्ष तेंडोली येथील स्थानिक भाजी विक्रेता त्या ठिकाणी भाजी विक्री करून आपली उपजीविका चालवत आहे या भाजी विक्रेत्यांना त्या ठिकाणाहून हलविण्यासाठी काही व्यवसायिकांनी अनेक प्रयत्न केले मात्र ते यशस्वी होऊ शकले नाही दरम्यान आज एका परप्रांतीय व्यवसायिकांनी या स्थानिक भाजी विक्रेता युवकाला ज्या ठिकाणी तू भाजी विक्री करत आहे ती भाजी विक्री करण्याची जागा माझी आहे लॉकडाऊन असल्यामुळे मी गावी गेलो होतो आता मला ही जागा पाहिजे आहे यावरून दोघांमध्ये वाद झाला आणि परप्रांतियांनी या स्थानिक भाजीविक्रेत्यासह त्याच्या पत्नीला मारहाण केली हे प्रकरण पोलिस ठाण्यापर्यंत गेले मात्र भाजीविक्री करणाऱ्या त्या स्थानिक पती- पत्नीला मारहाण झाल्याने त्यांची तपासणी जिल्हा रुग्णालय येथे करण्यासाठी पाठविण्यात आले मात्र याबाबत उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली नव्हती. स्थानिक भाजी विक्रेत्यांवर दादागिरी करण्याची परप्रांतीयांची ही पहिलीच वेळ नाही मात्र स्थानिक लोकप्रतिनिधी स्थानिकांना पाठिंबा न देता परप्रांतियांच्या बाजूने उभे राहतात. अशी स्थिती कुडाळ शहरामध्ये आहे.

अभिप्राय द्या..