You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या पुरस्कारांचे उद्द्या २९ सप्टेंबर रोजी वितरण..

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या पुरस्कारांचे उद्द्या २९ सप्टेंबर रोजी वितरण..

सिंधुदुर्गनगरी /-

सहकारात उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्था, पदाधिकारी, कर्मचारी व शेतकरी यांना सिंधुदुर्ग जिल्हा बँकेमार्फत दिले जाणा-या पुरस्कारांचे मान्यवरांच्या हस्ते बुधवारी दि.२९ सप्टेंबर २०२१ रोजी दुपारी १.०० वाजता ओरोस येथील शरद कृषीभवन सभागृहा मध्ये वितरण सोहळा संपन्न होणार आहे. सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था, सहकारी पदाधिकारी, सहकारातील कर्मचारी यांनी उत्साहाने काम करणेसाठी तसेच त्यांना काम करण्यास प्रोत्साहन मिळावे यासाठी त्यांच्या पाठीवर कौतुकाची/प्रोत्साहनाची थाप मिळणे आवश्यक असते. त्यासाठी सहकारी संस्था, सहकारी संस्थांचे पदाधिकारी, सहकारातील कर्मचारी व शेतकरी यांच्यासाठी जिल्हा बँक सन २०१६ पासून सिंधुदुर्गच्या सहकारातील ऋषीतुल्य व्यक्तिच्या नांवे पुरस्कार देण्यात येतात. त्यानुसार या वर्षाचे पुरस्कार वितरण बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये केले जाणार आहेत.

हे पुरस्कार खालील प्रमाणे देण्यात येणार आहेत. कै. शिवराम भाऊ जाधव स्मृती प्रित्यर्थ उत्कृष्ट सहकारी संस्था पुरस्कार सैनिक नागरी सह.पतसंस्था मर्या.सावंतवाडी यांना मिळाला आहे. कै. केशवरावजी राणे स्मृती प्रित्यर्थ उत्कृष्ट सहकारी संस्था पदाधिकारी पुरस्कार भालचंद्र केशव वारंग, अध्यश तुळसुली विकास संस्था, तुळसुली यांना मिळाला आहे. कै.डी. बी. ढोलम स्मृती प्रित्यर्थ उत्कृष्ट सहकारी संस्था कर्मचारी पुरस्कार कृष्णा दामोदर कर्ले, खारेपाटण विकास सोसायटी, खारेपाटण यांना प्राप्त झाला आहे. कै. भाईसाहेब सावंत स्मृती प्रित्यर्थ कृषीमित्र पुरस्कार राजाराम यशवंत मावळणकर यांना मिळाला आहे, तर कै. बाळासाहेब सावंत स्मृती प्रित्यर्थ दिला जाणारा जीवन गौरव पुरस्कार ब्रिगेडीयर सुधीर सावंत यांना देण्यात येणार आहे.

या पुरस्कार वितरण सोहळ्यास सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सहकारी संस्था, संस्था पदाधिकारी, सहकारातील कर्मचारी व शेतकरी यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सतिश ज. सावंत यांनी केले आहे.

अभिप्राय द्या..