You are currently viewing चिपी विमानतळाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते.;पालकमंत्री उदय सामंत यांची माहिती..

चिपी विमानतळाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते.;पालकमंत्री उदय सामंत यांची माहिती..

परुळे /-

सिंधुदुर्ग विमानतळाचा शुभारंभ ९ ऑक्टोबर रोजी निमंत्रित मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केंद्रीय हवाई मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया केंद्रीय मंत्री नारायण राणे एकाच व्यासपीठावर उपस्थित राहणार आहेत अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी चिपी विमानतळ टर्मिनल बिल्डिंगमध्ये पत्रकार परिषदेत दिली कोरोना महा बिमारी च्या पार्श्वभूमीवर विमानतळाचा शुभारंभाचा कार्यक्रम जाहीर पणे होणार नसून निमंत्रित लोकांच्या प्रमुख उपस्थितीत होईल आणि सर्वांसाठी युट्यूब आणि फेसबुकच्या माध्यमातून हा कार्यक्रम लाईव्ह करण्यात येईल याचा सर्वांनी लाभ घ्यावा तसेच विमानतळ परिसरात अचानक आलेल्या लोकांसाठी कॅम्पस च्या बाहेर दोन मंडप घालून मोठ्या दोन एलईडी स्क्रीनच्या माध्यमातून हा कार्यक्रम लाईव्ह केला जाईल जिल्ह्यात अजूनही कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने हा कार्यक्रम जाहीरपणे होणार नाही याकरिता निमंत्रित मान्यवर पत्रकार आणि विमानातून येणाऱ्या लोकांमध्ये होईल
या शुभारंभाच्या कार्यक्रमाला राज्यातील व केंद्रातील मंत्रीही उपस्थित राहणार आहे त्याच बरोबर जिल्ह्यातील मान्यवरांनाही निमंत्रण दिले जाणार आहे विमानतळाचे श्रेय कोणाला आहे त्यापेक्षा सिंधुदुर्ग वासी यांचे स्वप्न पूर्ण होते यातच आनंद सर्वांना आहे हे विमानतळ करत असताना ज्यांनी ज्यांनी योगदान दिले आहे त्यांना निमंत्रित केले जाईल माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्याशी मी स्वतः बोलून त्यांनाही निमंत्रित करणार आहे असेही पालकमंत्री सामंत यांनी सांगितले मुंबई विमानतळावर स्लॉट सकाळी मिळत नसल्याने दुपारच्या सत्रात मुंबई सिंधुदुर्ग विमान सेवा सुरू होत आहे एकच विमान नाहीतर या जिल्ह्यातील पर्यटनासाठी पाच ते सहा विमान सुरू करण्याची गरज पडली तर आमची तयारी आहे त्यासाठी काही सुविधा लागणार आहेत आज ११ केव्ही लाईन वर सकाळी विमानसेवेचे उद्घाटन ९ ऑक्टोंबर रोजी होत आहे नाईट सेवेसाठी ३३ केव्ही लाईन ची गरज आहे त्याचे नियोजन सुरू आहे भविष्यात हे विमानतळ आंतरराष्ट्रीय विमानतळ व्हावे यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या मार्गदर्शनातून प्रयत्न करणार आहोत पहिले विमान मुंबई सिंधुदुर्ग मुंबई असे असेल भविष्यात शिर्डी, तिरुपती, दिल्ली विमानसेवा सुरू करण्याचा मानस आहे मुंबईहून सिंधुदुर्गात येण्याचा विमानाचा दर २५२० तर जाण्याचा २६२१ रुपये आहे याबाबत अधिक माहिती घेऊन दराबाबत जिल्हावासीयांना दिलासा देण्यात येईल. पावसामुळे रस्त्यांची कामे थांबली आहेत पाऊस गेल्याबरोबर तात्काळ रस्त्यांची कामे सुरू होतील तशा प्रकारच्या वर्कऑर्डर संबंधित विभागाला देण्यात आल्या आहेत.

विमानतळाच्या शुभारंभ कार्यक्रम पत्रिकेत पुढील प्रमाणे मान्यवर उपस्थित राहणार आहेत अशी ही माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केंद्रीय हवाई मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया केंद्रीय लघु व सुष्म उद्योग मंत्री नारायण राणे उपमुख्यमंत्री अजित पवार सुभाष देसाई बाळासाहेब थोरात पालकमंत्री उदय सामंत आदिती तटकरे खासदार सुरेश प्रभू खासदार विनायक राऊत आमदार धनंजय डावखरे आमदार बाळा पाटील आमदार दीपक केसरकर आमदार वैभव नाईक आमदार नितेश राणे जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत दीपक कपूर आयआरबीचे वीरेंद्र म्हैसकर यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार असल्याची यावेळी माहिती दिली यावेळी पत्रकार परिषदेत पालकमंत्री उदय सामंत यांच्या समवेत आमदार वैभव नाईक संदेश पारकर व शिवसेनेचे पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा