कुडाळ तहसीलदार अमोल पाठक यांनी केले ई पीक,पाणीबाबत माणगाव हायस्कूल येथील विद्यार्थांना<br>मार्गदर्शन..

कुडाळ तहसीलदार अमोल पाठक यांनी केले ई पीक,पाणीबाबत माणगाव हायस्कूल येथील विद्यार्थांना
मार्गदर्शन..

कुडाळ /-

कुडाळ तहसिलदार अमोल पाठक व महसुल विभाग तलाठी शेणवी यांनी आज माणगांव हायस्कूल येथील विद्यार्थांना आपल्या सातबारावर आपल्या पीकाची नोंद घरच्या घरी ई पीक पाणी या अॅपच्या माध्यमातून कशी करायची त्या बद्दल माहिती देण्यात आली. सदर ग्रामीण भाग असल्याने शेतकरांची मुलं असल्याने त्यांना या अॅपची परिपुर्ण माहिती देण्यात आली विद्यार्थांचा चांगला प्रतिसाद लाभला. तलाठी शेणवी यांनी संपुर्ण नोंदणीची माहिती टीव्ही स्क्रीन च्या माध्यमातून आॅनलाईन पद्धतीने विद्यार्थांना करून दाखवली व विद्यार्थांना आपल्या घरी जाऊन आपल्या पालकांना माहीती देण्याचे आवाहन करण्यात आले.यावेळी कुडाळ तहसीलदार श्री अमोल पाठक, मंडलअधिकारी श्री आनंद नार्वेकर, तलाठी शेणवी, तलाठी योगेश राजगोळकर, मुख्याध्यापक प्रशांत धोंड, उपमुख्याध्यापक संजय पीळणकर, पर्यवेक्षक सी डी चव्हान, सर्व शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..