शिवसेना नेते, मसुरे गावचे सुपुत्र जयवंत परब यांचे निधन..

शिवसेना नेते, मसुरे गावचे सुपुत्र जयवंत परब यांचे निधन..

मुंबई /-

शिवसेना नेते तथा भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस जयवंत परब यांचे आज प्रदीर्घ आजाराने मुंबईत निधन झाले. लीलावती हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.मसुरे गावचे सुपुत्र असलेल्या जयवंत परब यांच्या निधनाने संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.जयवंत परब यांनी शिवसेनेच्या माध्यमातून अनेक पदे भूषविली होती तर त्यांचा कामगार चळवळीतसुद्धा सक्रिय सहभाग होता.

अभिप्राय द्या..