वेंगुर्ला ग्रामीण रूग्णालय येथे भाजपा महिला मोर्चा तर्फे फळे वाटप

वेंगुर्ला ग्रामीण रूग्णालय येथे भाजपा महिला मोर्चा तर्फे फळे वाटप

वेंगुर्ला /-

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टीने दिनांक १४ सप्टेंबर ते २० सप्टेंबर संघटन ही सेवा असा सेवा सप्ताह साजरा करण्याचे नियोजन केले आहे. या सेवा सप्ताहा अंतर्गत आज १९ सप्टेंबर रोजी सकाळी वेंगुर्ला ग्रामीण रुग्णालयातील सर्व रुग्णांना भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा तर्फे फळे वाटप करण्यात आली. यावेळी वेंगुर्ला मंडल महिला मोर्चा अध्यक्ष स्मिता दामले, मंडल अध्यक्ष सुहास गवंडळकर ,नगराध्यक्ष दिलीप गिरप ,नगरसेविका साक्षी पेडणेकर,नगरसेवक प्रशांत आपटे, शहर महिला मोर्चा प्रमुख प्रार्थना हळदणकर,अणसुर सरपंच अन्वीता गावडे, वृंदा गवंडळकर, शांती केळुस्कर, हसीना बेन मकानदार आदी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..