कुडाळ /-

चेंदवण ठुंबरेवाडी येथे मृतावस्थेत आढळलेल्या त्या महिलेची ओळख पटली असून भोगवे येथून बेपत्ता झालेल्या सौ. कविता सदानंद आरोलकर (वय ५१) तिचा तो मृतदेह असल्याचे नातेवाईकांनी ओळखले असून आज (मंगळवारी) हा मृतदेह नातेवाईकांनी ताब्यात घेतला. भोगवे येथील सौ कविता सदानंद आरोलकर या बुधवार ८ सप्टेंबर पासून बेपत्ता होत्या याबाबत त्यांचे पती सदानंद विठ्ठल आरोलकर यांनी रविवार ११ सप्टेंबर रोजी निवती पोलीस ठाण्यात सौ कविता आरोलकर या बेपत्ता असल्याबाबत तक्रार दाखल केली होती या आधी सुद्धा त्या बेपत्ता होऊन पुन्हा घरी परत गेल्या घटना होत्या. मात्र यावेळी त्या घरी परतल्या नसल्यामुळे त्यांनी पोलीस ठाण्यात याबाबत खबर दिली. दरम्यान चेंदवण ठुंबरेवाडी येथे संदीप डुंबरे यांना ते जात असलेल्या पायवाटेच्या जंगल भागात गुरुवार १६ सप्टेंबर रोजी कुजलेल्या स्थितीत एका महिलेचा मृतदेह अजून आला होता याबाबत त्यांनी निवती पोलीस ठाण्यात खबर दिली होती त्यानंतर सौ कविता आरोलकर यांच्या नातेवाईकांना ओळख पटवण्यासाठी बोलविण्यात आले होते मात्र याबाबत ओळख पटत नसल्यामुळे हा मृतदेह येथील शवगृहात ठेवण्यात आला होता त्यानंतर या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक वारंग तसेच नाईक, शेळके यांनी करून नातेवाईकांजवळ चौकशी केली असता बेपत्ता झाल्यावर सौ कविता आरोलकर या आपल्या कवठी येथील बहिणीच्या घरी आल्या होत्या त्यानंतर त्या पुन्हा कवठी वरून निघून गेल्या. त्या कवठी वरून जाताना परिधान केलेल्या साडीवरून कवठी येथील त्यांच्या नातेवाईकांनी मृतदेह ओळखला. या मृतदेहाची अखेर ओळख पटली आणि भोगवे येथून बेपत्ता झालेल्या सौ कविता आरोलकर यांचा मृतदेह असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान हा मृतदेह नातेवाईकांनी ताब्यात घेऊन येथे अंत्यसंस्कार केले. अशी माहिती निवती पोलीस ठाण्यात मधून देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page