You are currently viewing मोती तलावात अज्ञाताने घेतली उडी.;पोलिसांचे शोधकार्य सुरु..

मोती तलावात अज्ञाताने घेतली उडी.;पोलिसांचे शोधकार्य सुरु..

सावंतवाडी /-

सावंतवाडी येथील मोती तलावात एका अज्ञात इसमाने उडी घेतली आहे. ही घटना आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास येथील राजवाड्यासमोर घडली. दरम्यान पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून संबंधित व्यकीचा शोध घेत आहेत.

संबंधित इसमाने तलावात उडी घेण्यापूर्वी आपली दुचाकी त्याच परिसरात रस्त्यावर उभी करून ठेवली आहे. तर तलावाच्या काठावर चप्पल काढून ठेवले आहे. दरम्यान तलावात उडी घेताना त्याला काही स्थानिक नागरिकांनी पाहिले. त्यामुळे याबाबतची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शोध कार्य हाती घेतले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा