You are currently viewing बेकायदा दारू वाहतूकी प्रकरणी<br>कुडाळ-वाडोस येथील एकाला बांदा येथे अटक २ लाख ७० हजाराचा मुद्देमाल जप्त..

बेकायदा दारू वाहतूकी प्रकरणी
कुडाळ-वाडोस येथील एकाला बांदा येथे अटक २ लाख ७० हजाराचा मुद्देमाल जप्त..

बांदा /-

बेकायदा दारू वाहतूक प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर येथील भरारी पथकाने आज कुडाळ-वाडोस येथील एकाला बांदा येथे अटक केली. यावेळी त्याच्याकडून ३५ दारुचे बॉक्स व दारु वाहतुकीसाठी वापरलेली कार असा तब्बल २ लाख ६९ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई बांदा-पत्रादेवी मार्गावर करण्यात आली. याप्रकरणी अटक केलेल्या युवकाचे नाव प्रथमेश प्रभाकर राऊळ (वय२७) असे असून तो मोरेवडाचे टेंब, वाडोस, ता. कुडाळ येथील रहिवासी आहे.

गोव्यातून दारु वाहतूक होणार असल्याची पक्की माहिती कोल्हापूर पथकाला मिळाली होती. त्यानुसार कोल्हापूर विभागीय उपायुक्त यशवंत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक पी. आर. पाटील, उपनिरीक्षक आर. जी. येवलुजे, कुमार कोळी, जवान सुशांत बनसोडे, विलास पवार, अमोल यादव, कृष्णात पाटील व दीपक कापसे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

अभिप्राय द्या..