You are currently viewing ओरोस येथे कोवीड योद्धा आंदोलनास राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा आरोग्य मंत्र्यांचे लक्ष वेधणार.;अमित सामंत.

ओरोस येथे कोवीड योद्धा आंदोलनास राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा आरोग्य मंत्र्यांचे लक्ष वेधणार.;अमित सामंत.

ओरोस /-

राज्य सरकारने कोरोना प्रभाव काळात जिल्ह्य़ातील २७२ कर्मचाऱ्यांना आरोग्य खात्याच्या विविध विभागामार्फत कोवीड योद्धा म्हणून नियुक्ती देण्यात आली होती.आणी अचानक कोणतीही पूर्व कल्पना न देता. ३१ ऑगस्ट २०२१पासुन त्यांची सेवा समाप्तीचे आदेश काढून त्यांना कार्यमुक्त करण्यात आले.या कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात अत्यंत कठीण काळात आपल्या जिवाची पर्वा न करता सेवा बजावली होती.याचा प्रशासनाला विसर पडला.असुन या कर्मचाऱ्यांवर अन्याय झालेला आहे.त्यामुळे या सर्व कोवीड योद्धयांनी शासनाकडून आपल्या सेवा समाप्तीचे दिलेले आदेश तात्काळ रद्द करून पून्हा सेवेत सामावून घेण्यासाठी पुकारलेल्या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी भेट देऊन त्यांच्याशी चर्चा करून कोवीड योद्ध्याच्या मागण्या ह्या रास्त आहेत.राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या भूमिकेशी सहमत असून आपणास योग्य न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून तातडीने उपमुख्यमंत्री नाम.अजितदादा पवार.व राज्याचे आरोग्य मंञी ना.राजेश टोपे यांचे लक्ष वेधून अन्याय झालेल्या सर्व कोवीड योद्धयांच्या मागण्या मान्य करून या कर्मचाऱ्यांना दिलासा देण्यासाठी खासबाब म्हणून प्रयत्न करणार असल्याचे जिल्हाध्यक्ष मा.अमित सामंत यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा