सावंतवाडी/-

सावंतवाडी मराठा समाजाची गाव निहाय निवेदन सह्यांची मोहीम आज सावंतवाडी शहरापासून सुरुवात करण्यात आली मराठा समाजाचे अध्यक्ष सीताराम गावडे उपाध्यक्ष लक्ष्मण नाईक सचिव आकाश मिसाळ यांच्या हस्ते निवेदनावर ग्रामस्थांच्या सह्या घेऊन या मोहिमेला सुरुवात झाली.

सावंतवाडी तालुक्यातील प्रत्येक गावांमध्ये मराठा समाज बांधवांनी जिल्हा मराठा क्रांती मोर्चा ने जे निवेद दिले आहे त्यावर सह्या घेऊन ते निवेदन गुरुवारी संध्याकाळी पाच वाजता आरपीडी हायस्कूलच्या सभागृहात आयोजित बैठकीत द्यायचे आहे असे निश्चित करण्यात आले.

ज्या गावातील मराठा समाज बांधवांपर्यंत अद्याप पर्यंत हे निवेदन पोहोचले नसेल त्यांनी मराठा समाज बांधवांच्या सह्या घेऊन तो सह्याचा कागद गुरुवार दिनांक२४ सप्टेंबर पर्यंत द्यावयाचा आहे. समाजातील प्रत्येक समाज बांधवांनी याबाबतची जनजागृती करून हे काम आपल्या घरातीलच आहे असे समजून गावात सह्यांची मोहीम राबवून त्या सह्या गुरुवारच्या बैठकीत आणून द्यावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.
मराठा समाजाचे कार्य आणि व्याप्ती वाढविण्याचे या बैठकीत ठरविण्यात आले. त्या अनुषंगाने प्रत्येक गावात मराठा समाजाची शाखा स्थापन करून शाखा अध्यक्ष उपाध्यक्ष नेमणूक करण्याचे निश्चित करण्यात आले. सोमव सोमवार दिनांक २८ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता प्रत्येक तालुक्याच्या वतीने तहसीलदार यांना मराठा समाजाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हे निवेदन देण्यात येणार आहे. जिल्ह्यातून सुमारे एक लाख सह्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात येणार आहे.
त्यादृष्टीने सावंतवाडी तालुक्यातून किमान २५००० हजार सह्यांचे उद्दिष्ट उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे ते पूर्ण करण्यासाठी तळागळातील मराठा समाजाने झोकून देऊन काम करावे असे आवाहन बैठकीत करण्यात आले. यावेळी मराठा समाज अध्यक्ष सीताराम गावडे उपाध्यक्ष लक्ष्मण नाईक सचिव आकाश मिसाळ पंचायत समिती सदस्य शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ काँग्रेस माजी तालुकाध्यक्ष बाब्या म्हापसेकर नगराध्यक्ष संजू परब सुशील आमुणेकर प्रभाकर गावडे सखाराम जामदार सिताराम लाड पांडुरंग राऊळ अपर्णा कोठावळे पुंडलिक दळवी चंद्रकांत राणे सतीश बागवे प्रशांत देसाई विनायक गुरव डी के सावंत विनोद सावंत दत्‍ताराम सावंत दिगंबर नाईक सदाशिव सावंत अभिमन्यू लोंढे दिलीप कोठावळे आदि उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page