प्रारुप सागरी किनारा आराखड्याची ऑनलाईन जनसुनावणी रद्द करा; अरविंद मोंडकर

प्रारुप सागरी किनारा आराखड्याची ऑनलाईन जनसुनावणी रद्द करा; अरविंद मोंडकर

मालवण /-

प्रारुप सागरी कीनारा आराखड्या संदर्भात २८ तारखेला आयोजित करण्यात आलेली ऑनलाईन जनसुनावणी रद्द करण्यात यावी,अशी मागणी राष्ट्रीय मच्छीमार संघटनेच्या माध्यमातून जिल्हाधिकार्‍यांकडे करण्यात आली आहे.याबाबत संघटनेचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर यांनी त्यांना पत्र दिले आहे.
यात ऑनलाईन सभा घेण्यासाठी आवश्यक असलेले रेंज गावात उपलब्ध नाही,या क्षेत्रातील बाधीत लोकांना आधुनिक तंत्रज्ञान वापरण्याबाबत पुरेशी माहीती नाही,तसेच जनसुनावणी मध्ये जिल्ह्या बाहेरील मंडळी या सुनावणी सहभागी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे त्या सभेला बाहेरचे लोक अ‍ॅड झाल्यास त्याला वेगळे स्वरुप प्राप्त होवू शकते.त्यामुळे याबाबत ही सभा ऑनलाईन घेवू नये,असे त्यांनी म्हटले आहे.

अभिप्राय द्या..