मातृत्व आधार फाऊंडेशन तर्फे ग्रामीण रुग्णालयात आरोग्य रक्षक वस्तूंचे वाटप..

मातृत्व आधार फाऊंडेशन तर्फे ग्रामीण रुग्णालयात आरोग्य रक्षक वस्तूंचे वाटप..

मालवण / –

मातृत्व आधार फाऊंडेशन मालवण तर्फे शासकीय ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना आरोग्य रक्षक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
कोरोनाच्या महामारीत, स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या करणाऱ्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांना, 100 फेसशिल्ड, 5लिटर सॅनीटायझर व हॅन्ड ग्लोव्ज तसेच 20 उपचार घेत असलेल्या रुग्णांना सफरचंद फळं व बिस्किट मोफत वाटप करण्याचा उपक्रम राबविण्यात आला.

यावेळी वाहन चालक,श्री. दत्ता मयेकर, श्री. अवधूत परुळेकर,खोत सिस्टर यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात.

यावेळी रुग्णालयातर्फे डॉ. बालाजी पाटील, डॉ. कपिल पाटील, तसेच फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. आप्पा चव्हाण, संस्थापक श्री. संतोष लुडबे, संचालक श्री. प्रसाद भोजने, मनोज खोबरेकर, श्री. संतोष नाटेकर, सौ. पुजा करलकर, श्री. विश्वास गावकर, श्री. श्री. दत्ता नेरकर व सेवक सदस्य, श्री सुर्यकांत फणसेकर, श्री. जगदीश तोडणकर, श्री. विजय परुळेकर, कु. दिक्षा लुडबे, कु.समिधा लुडबे, श्री . नितीन मांजरेकर , श्री. बाबू, . मोरजकर, श्री. शैलेश पावसकर, श्री. संदिप नेवाळकर, श्री. संदिप लुडबे, श्री. नारायण लुडबे, सौ. पेडणेकर, श्री, बाळा लुडबे, श्री. श्री. प्रमोद करलकर, पी. के. चौकेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

संस्थापक श्री. संतोष लुडबे, अध्यक्ष श्री. आप्पा चव्हाण यांचे हस्ते, भेट वस्तू डॉ. बालाजी पाटील, यांचेकडे सुपूर्द करण्यात आले.

अभिप्राय द्या..