सावंतवाडी सालईवाडा येथे दोन मोटरसायकलचा अपघात..

सावंतवाडी सालईवाडा येथे दोन मोटरसायकलचा अपघात..

सावंतवाडी /-

दोन दुचाकींची एकमेकांना धडक बसून झालेल्या अपघातात एक वृद्ध गंभीर जखमी झाला. हा अपघात आज दुपारी साडेबाराच्या वाजण्याच्या सुमारास सालईवाडा येथे घडला. दरम्यान त्यांना प्राथमिक उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने अधिक उपचारासाठी कुडाळ येथील रुग्णालयात हलविण्यात आले.

याबाबत अधिक माहिती अशी की, दुचाकी घेऊन वृद्ध व्यक्ती सावंतवाडीहून माजगावच्या दिशेने जात होते. यावेळी दुसऱ्या दुचाकीने त्यांना जोरदार धडक दिली. यात ते जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र याबाबत पोलिस ठाण्यात कोणतीही नोंद नाही.

अभिप्राय द्या..