बांदा /-
दि.३१/०८/२०२१
जिल्हा परिषद बांदा नं. १ केंद्रशाळेतील विद्यार्थ्यांनी गोपाळकाला सणाच्या निमित्ताने घरातूनच राधाकृष्णच्या वेशभूषा परिधान करून हा दिवस उत्साहाने साजरा केला.भारतीय संस्कृतीत सण उत्सव यांना मानचे स्थान आहे .श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. तसेच या सणाच्या निमित्ताने दहीहंडी फोडण्याचे आयोजन केले जाते रोजच्या कामातून व धकाधकीतून लोक एकत्र येऊन हा कार्यक्रम उत्साहात साजरा करतात यातून एकी हेच बळ हा बोध बिंबवला जातो.
गेले दिडवर्षाहून अधिक काळ कोरोनाच्या महामारीमुळे सण उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे करण्यावर बंदी आहे यासाठी बांदा केंद्रशाळेच्या वतीने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळवा यासाठी आॅनलाईन उपक्रम सातत्याने चालू ठेवले आहेत.
गोपाळकाला सणाच्या निमितताने विद्यार्थ्यांना आपल्या घरात उपलब्ध असलेल्या साहित्याचा वापर करून राधाकृष्ण यांची वेशभूषा साकारावी असे आवाहन केले होते. यानुसार विद्यार्थ्यांनी रधाकृष्ण यांच्या वेशभूषा साकारून हा दिवस उत्साहात साजरा केला. या विद्यार्थ्यांना पालक व शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले.