संजय गांधी निराधार योजनेंतर्गत ५३ प्रकरणांना मंजुरी…

संजय गांधी निराधार योजनेंतर्गत ५३ प्रकरणांना मंजुरी…

मालवण / –
संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्या आज झालेल्या बैठकीत विविध योजनांचा ५३ प्रकरणांना मंजुरी देण्यात आली आहे.
समितीची बैठक आज तहसील कार्यालयात समिती अध्यक्ष मंदार केणी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी तहसीलदार अजय पाटणे, नायब तहसीलदार साईनाथ गोसावी, सदस्य गणेश कुडाळकर, सुनिल पाताडे, अनुष्का गावकर, प्रमोद कांडरकर, महेंद्र मांजरेकर, भाऊ चव्हाण, कृष्णा चव्हाण आदी उपस्थित होते.
यावेळी संजय गांधी निराधार, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग वेतन योजना या ५३ प्रकरणांना मंजुरी देण्यात आली.

अभिप्राय द्या..