वेंगुर्ला /


तालुक्यातील रेडी गावासाठी असलेले एकमेव लाईनमन गजानन कांबळी हे सेवानिवृत्त होत असल्याने रेडी साठी त्यांच्या जागी दुसरा कायमस्वरूपी लाईनमन मिळावा अशी मागणी रेडी ग्रामपंचायत सरपंच रामसिंग राणे यांनी महावितरणचे कनिष्ठ अभियंता खटावकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई,जि.प सदस्य प्रितेश राऊळ,पं.स.सदस्य मंगेश कामत आदी उपस्थित होते.गणेशोत्सव जवळ आल्यामुळे वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी कायमस्वरूपी लाईनमन असणे आवश्यक आहे . कारण काॅन्ट्रक्ट वर असलेले लाईनमन हे सायंकाळी ६ वा. नंतर सेवा देत नसल्याने रात्रीच्या वेळी अडचण निर्माण होते , त्यामुळे कायमस्वरूपी लाईनमन मिळावा अशी मागणी रेडी ग्रामपंचायत सरपंच रामसिंग राणे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page