You are currently viewing स्वत:वरील केसेस कशा काढायच्या हे अजित पवारांकडून शिकावे नारायण राणे..

स्वत:वरील केसेस कशा काढायच्या हे अजित पवारांकडून शिकावे नारायण राणे..


सिंधुदुर्ग /-जनआशीर्वाद यात्रेत मांजर आडवी गेली, असा घणाघात करत केंद्रीय लघू आणि सूक्ष्म उद्योग मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर टीका केली. ते कणकवलीत बोलत होते. तसेच एका दिवसात स्वत:वरील केसेस कशा काढायच्या हे अजित पवारांकडून शिकावे, अशी टीका राष्ट्रवादीवर केली.

अजित पवार अज्ञानी:-

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल राणेंवर टीका करताना निधी येत नसल्याचे म्हटले होते. यावर राणे यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. अजित पवार अज्ञानी असल्याचे ते म्हणाले. आपले खाते रोजगार निर्माण करणारे असल्याचेही ते म्हणाले.

प्रहारमधून करणार प्रहार:-

संजय राऊत यांनी स्वत:च्या मालकांच्या मुलांकडे लक्ष द्यावे. माझ्या मुलांची काळजी करू नये. राणेंवर टीका करणाऱ्यांना शिवसेनेत चांगली वागणूक मिळते. सामनातील अग्रलेखात वैयक्तिक टीका केली तर प्रहारमधून त्यांच्यावर टीका करणार असल्याचे ते म्हणाले.संजय राऊत यांना आपण किंमत देत नाही, असेही ते म्हणाले. संजय राऊत यांच्यामुळे शिवसेनेची अधोगती होत आहे, असा घणाघात त्यांनी केला.उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात बंद दाराआड नाही, तर उघडपणे चर्चा झाली, असे ते म्हणाले. तसेच कोणत्याही प्रकारची चर्चा झाली, तरी मला काहीही फरक पडत नाही, असे त्यांनी सांगितले.

अभिप्राय द्या..