You are currently viewing नारायण राणे यांनी आपली भूमिका बदलावी अन्यथा १७ तारीख नंतर त्यांच्या सोबतचा माझा राजकीय संघर्ष अटळ.;आ.दीपक केसरकर

नारायण राणे यांनी आपली भूमिका बदलावी अन्यथा १७ तारीख नंतर त्यांच्या सोबतचा माझा राजकीय संघर्ष अटळ.;आ.दीपक केसरकर

सावंतवाडी /-


आतातरी नारायण राणे यांनी आपली भूमिका बदलावी अन्यथा १७ तारीख नंतर त्यांच्या सोबतचा माझा राजकीय संघर्ष अटळ माजी पालकमंत्री व आमदार दीपक केसरकर यांनी दिला नारायण राणेंना इशाराचं

हायकोर्टाचा निकाल १७ तारीख ला लागल्यानंतर मी माझी भूमिका स्पष्ट करणार असून, आतातरी नारायण राणे यांनी आपली भूमिका बदलावी अन्यथा त्यांच्या सोबतचा माझा राजकीय संघर्ष अटळ आहे. असा इशारा माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार दिपक केसरकर यांनी सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषद दिला आहे.माझा राजकीय संघर्ष रक्तरंजित नसल्यानेच कोकणच्या जनतेने मला निवडून दिले. त्यामुळे मला मिळालेले यश हे कोकणी जनतेचे आहे.असे देखील ते म्हणाले आहेत. कोकणातील अन्यायाविरुद्ध मी केवळ एक आमदार असताना संघर्ष सुरू केला होता. आणि केवळ एक साधा आमदार असतानाच यश मिळवले आहे.

यावेळी ते पुढे म्हणाले की, आपल्या नेत्याला मंत्री पद मिळाल्यानंतर कार्यकर्त्यांना आनंद होणे गरजेचे आहे. तसेच भाजपच्या सुरू असलेल्या जन आशीर्वाद यात्रेला देखील आपला विरोध नाही. परंतु, जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन कार्यकर्त्यांनी संयम पाळणे गरजेचे आहे. असे मत देखील त्यांनी मांडले आहे. यावेळी तालुका प्रमुख रुपेश राऊळ, उपजिल्हा प्रमुख अशोक दळवी, जिल्हा उप संघटक शब्बीर मणियार आदी पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा