You are currently viewing पीएम किसान योजनेची ऑनलाइन साईट पुन्हा सुरू…

पीएम किसान योजनेची ऑनलाइन साईट पुन्हा सुरू…

देवगड /-

पीएम किसान योजनेची बंद पडलेली साईट पुन्हा सुरु झाली आहे. यासाठी देवगड पं. स. चे उपसभापती रविंद्र तिर्लोटकर यांनी खास. सुरेश प्रभुंकडे केलेला पाठपुरावा यशस्वी ठरला आहे.

गेले तीन महिने प्रधान मंत्री किसान सन्मान योजनेची ऑनलाईन साईट बंद होती. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना योजनेपासून वंचित राहावे लागले होते. रानभाजी महोत्सवाच्या भाषणात देवगड पं. स. चे उपसभापती रविंद्र तिर्लोटकर यांनी हा मुद्दा उपस्थित करून आम. नितेश राणे यांचे लक्ष वेधले होते. तसेच याविषयीचे निवेदनही खास. सुरेश प्रभू यांच्याकडे ४ आॕगस्ट रोजी प्रत्यक्ष भेटून दिले होते आणि ही बंद असलेली साईट पुन्हा सुरु करण्याची विनंती केली होती. याची दखल घेत खास. सुरेश प्रभु यांनी केंद्रीय कृषी मंत्री नरेंन्द्र सिंह तोमर यांना दि. 13 आॕगस्ट रोजी पत्र पाठवून याविषयी पाठपुरावा केला होता. ही बाब समजताच केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी पीएम किसान सन्मान योजनेची ऑनलाईन साईट सुरु करण्याचे आदेश देताच दि. 19 आॕगस्ट रोजी साईट चालू करण्यात आली आहे. त्यामुळे देवगड पं. स. चे उपसभापती रविंद्र तिर्लोटकर यांनी खास. सुरेश प्रभुंकडे केलेला पाठपुरावा यशस्वी ठरला आहे. या योजनेपासून वचिंत राहिलेल्या शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपसभापती रविंद्र तिर्लोटकर यांनी केले आहे.

अभिप्राय द्या..