कणकवली/-
कोरोना महामारी सुरु झाल्यापासून आतापर्यंत गावातील ग्राम कृती दलाने उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे.त्याबद्दल वागदेत युवा कौशल्य विकास संस्थेच्यावतीने कोरोना योध्याचा गौरव सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
यामध्ये युवा कौशल्य विकास संस्था अध्यक्ष विरेन गायकवाड यांच्या संकल्पनेतुन वागदे सरपंच पुजा उमेश घाडीगांवकर,वागदे उपसरपंच
रुपेश रमेश आमडोसकर,वागदे उपसरपंच संतोष बाबु गावडे,ग्रामसेवक ऋतुराज महादेव कदम ,पोलीस पाटील सुनिल सखाराम कदम,आरोग्य सेवक गंगाधर अनंत पाटील,आशा सेविका मेघना बाबाजी घाडीगांवकर,श्रध्दा सुनिल गावडे,आरोग्य सेविका सुदिप्ती सुरेश सावंत,पोलीस सुप्रिया बाळा सावंत,पोलीस प्रदिप शशिकांत गोसावी,रुग्णवाहिका १०८ वाहक रमेश मोरे आदींना कोरोना योध्दा म्हणून गौरव करण्यात आला.
यावेळी युवा कौशल्य विकास संस्था अध्यक्ष विरेन गायकवाड, उपाध्यक्ष संदेश परब,सदस्य लक्ष्मण गावडे,अमित घाडीगांवकर ग्रामपंचायत सदस्य ललित घाडीगांवकर, गावचे सामाजिक कार्यकर्ते विलास गोलतकर ,रवि गावडे,आप्पा गोलतकर,विजय घाडीगांवकर, शिरिष घाडीगांवकर ग्राम पंचायत कर्मचारी आदी उपस्थित होते.