सिंधुदुर्ग /-

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेला आजपासून पुन्हा सुरुवात होत आहे. नारायण राणे यांना अटक झाल्यामुळे त्यांची जनआशीर्वाद यात्रा स्थगित झाली होती.न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर आता पुन्हा एकदा राणे जनतेचा आशीर्वाद मागायला जाणार आहे. आजपासून राणे तीन दिवसीय कोकण दौऱ्यावर आहेत.

योद्धा पुन्हा मैदानात…..!

मुख्यमंत्र्यांवर बोलताना राणेंना अपशब्द वापरला आणि त्यानंतर झालेला राडा सगळ्या देशाने पाहिला. आता हे सगळं पाठीमागे सोडून राणे पुन्हा एकदा जनआशीर्वाद घ्यायला बालेकिल्ल्यात जात आहेत. सिंधुदुर्ग तसंच कणकवली शहरात राणेंचं जंगी स्वागत करण्यासाठी राणे समर्थकांनी कंबर कसलीय. योद्धा पुन्हा मैदानात, अशा आशायचे बॅनर्स शहरभर लागले आहेत. या बॅनर्सवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राणेंचा फोटो आहे.

राणे तीन दिवस कोकणात, मोठं शक्तीप्रदर्शन करणार

भाजप आमदार नितेश राणे यांनी त्यांच्या सोशल मीडियावरुन एक फ्लेक्स शेअर केला आहे.ज्यामध्ये राणेंच्या तीन दिवसीय कोकण दौऱ्याचा उल्लेख करण्यात आलाय. राणे आज रत्नागिरी जिल्ह्यात असतील तर पुढचे दोन दिवस सिंधुदुर्गात असतील. नितेश राणेंनी शेअर केलेल्या फ्ले्सवर देखील योद्धा पुन्हा मैदानात, असं लिहिलं आहे.

राणेंच्या स्वागतासाठी कोकण सज्ज..

नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेतील नियोजित कोकण दौरा होता. परंतु त्यांनी केलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील वक्तव्याने मंगळवारी दिवसभर राडा झाला. पोलिसांनी त्यांना अटक केली. रात्री उशिरा त्यांना जामीन मिळाला. जामीन मिळाल्यानंतर मध्यरात्री त्यांनी महाडवरुन मुंबईकडे प्रयाण केलं. दोन दिवस म्हणजेच बुधवारी आणि गुरुवारी आराम करुन आज शुक्रवार पासून पुन्हा त्यांची जनआशीर्वाद यात्रा सुरु होत आहे.

नारायण राणे यांच्या स्वागतासाठी त्यांचा बालेकिल्ला असलेलं कणकवली शहर सज्ज झालंय. अगदी पहिल्यापासून नारायण राणेंना ज्या कणकवलीने डोक्यावर घेतलं, त्यांना कधी अंतर दिलं नाही, त्याच राणेप्रेमी कणकवली शहरांत चौकाचौकात राणेंच्या स्वागताला गुढ्या उभारल्या गेल्या आहेत. राणे-सेना राड्यानंतर दादांचं जंगी स्वागत करण्यासाठी राणे समर्थक आणि भाजप कार्यकर्त्यांनी कंबर कसलीय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

You cannot copy content of this page