You are currently viewing मुठ – उभादांडा मच्छिमार सोसायटी व भाजपाच्या मागणीला यश..

मुठ – उभादांडा मच्छिमार सोसायटी व भाजपाच्या मागणीला यश..

वेंगुर्ला /-


तालुक्यातील मुठ उभादांडा मच्छिमार संस्थेच्या वतीने वेंगुर्ले तहसीलदार यांना शासनाकडून लहान मासळी विक्रेत्यांना सानुग्रह अनुदान मिळाले नसल्याने २ सप्टेंबर रोजी तहसीलदार कार्यालयासमोर मच्छी विक्रेत्या महिलांसह आमरण उपोषण करणार असल्याचे निवेदन देण्यात आले होते.यावेळी भाजपा च्या वतीने जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई यांनी मस्त्यविभाग अधिकारी व मच्छिमार संस्थेचे पदाधिकारी यांची संयुक्त बैठक तहसीलदार साहेबांच्या दालनात लावावी अशी मागणी तहसीलदार प्रवीण कुमार लोकरे यांचेकडे केली होती. या मागणीची दखल घेऊन शुक्रवार २७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता सहाय्यक आयुक्त मस्त्य विभाग व मच्छिमार संस्थेच्या पदाधिकारयांची बैठक तहसीलदार कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे.त्यामुळे लवकरच या प्रश्नी तोडगा निघेल अशी आशा निर्माण झाली आहे.

अभिप्राय द्या..