केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणेंना उद्या रायगड जिल्हासत्र न्यायालयात हजर करणार..

केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणेंना उद्या रायगड जिल्हासत्र न्यायालयात हजर करणार..

हायकोर्टाने अटकपूर्व जामिनावरती तात्काळ सुनावणी घेण्यास दिला नकार..

रत्नागिरी /-

राणेंना संगमेश्वरमधून घेऊन महाड पोलिस महाडच्या दिशेने रवाना झाले आहेत. मुंबई हायकोर्टाने अटकपूर्व जामिनावरती तात्काळ सुनावणी घेण्यास नकार दिल्यानंतर पोलिस राणेंना घेऊन महाडकडे रवाना झाले असून उद्या नारायण राणेंना रायगड जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्यामुळे आजची रात्र राणेंना महाड पोलिस ठाण्यातच काढावी लागण्याची शक्यता आहे. तसेच मुंबई हायकोर्टमध्येही राणेंच्या याचिकेवर उद्याच सुनावणी होणार आहे. आज कुठल्याही न्यायालयाकडून राणेंना दिलासा मिळालेला नाही.

महाड येथे जनआशीर्वाद यात्रेवेळी केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बदनामीकारक वक्तव्य केले होते. त्याविषयी महाड पोलिस ठाण्यात तक्रार नोंद करण्यात आली होती.

अभिप्राय द्या..