वेंगुर्ला /-
वेंगुर्ला नागरिकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुरू केलेल्या “माझे कुटुंब माझी जबाबदारी” या मोहिमेस सहकार्य करावे,असे आवाहन वेंगुर्ले तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर यांनी केले आहे. सद्यस्थितीत तालुक्यात वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहता सर्वांनी विशेष दक्षता घ्यावी. बरेचजण खोकला ताप असल्यास सरकारी यंत्रणा स्वाब घेणार याकरिता लक्षणे लपवून ठेवतात.तपासणीकरिता डॉक्टरकडे जात नाहीत अथवा आरोग्य यंत्रणेला सांगत नाहीत.अशांने रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाण वाढत आहे.तसेच अशा लक्षणे असलेल्या व्यक्तीमुळे समूह संसर्ग वाढत आहे.तरी महाराष्ट्रचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी “माझे कुटुंब माझी जबाबदारी” ही मोहीम चालू केली आहे.त्यामध्ये घरोघरी माहिती व तपासणीकरिता येणाऱ्या आरोग्य यंत्रणेला सहकार्य करावे.माहिती व आजारपण लपपून ठेवू नये.तसेच सर्वांनी सकस प्रोटीन युक्त आहार घ्यावा.गरम पाणी प्यावे,पुरेशी विश्रांती घ्यावी,विनाकारण गर्दीत जाणे टाळावे,मास्क व्यवस्थितरित्या परिधान करावे,नेहमी हात स्वच्छ ठेवावेत,आजार लपवून न ठेवणे,आदी गोष्टी कटाक्षाने करणे आवश्यक आहे,असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ अश्विनी माईणकर यांनी केले आहे.