You are currently viewing इनरव्हील क्लब ऑफ वेंगुर्लेच्या वतीने गरजू महिलांना जीवनावश्यक वस्तू व विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप..

इनरव्हील क्लब ऑफ वेंगुर्लेच्या वतीने गरजू महिलांना जीवनावश्यक वस्तू व विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप..

वेंगुर्ला /-


इनरव्हील क्लब ऑफ वेंगुर्ले कडून सामाजिक बांधिलकी जपत गरजू महिलांना जीवनावश्यक वस्तू
व विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले.तसेच मुलींना सॅनेटरी नॅपकिनचेही वाटप करण्यात आले.डिस्ट्रिक्ट चेअरमन रत्ना बेहेरे यांनी क्लबला नुकतीच भेट दिली.त्यात त्यांनी क्लबच्या कामाचे कौतुक व क्लबला मार्गदर्शन केले.यानिमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये सुरुवातीला ७५ व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने रोटरॅकट क्लब ऑफ होमिओपॅथिक कॉलेजच्या मुलांनी भगतसिंग,सुखदेव व राजगुरु यांच्या देशभक्ती व समर्पणावर नाटिका व देशभक्तीपर गीते सादर केली.
इनरव्हील क्लब ऑफ वेंगुर्लेच्या अध्यक्षा ज्योती देसाई यांनी डिस्ट्रिक्ट चेअरमन रत्ना बेहेरे यांचे स्वागत केले व पुढील वर्षभरातील घेण्यात येणाऱ्या कामांची रुपरेषा समजाविली.तसेच कोरोना कालावधीत विनामोबदला काम केलेल्या डॉ.स्वप्निल परब व रोटरॅकट अध्यक्ष दुर्गेश पाटील यांचा कोव्हिड योद्धा म्हणून चेअरमन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाला उपाध्यक्षा डॉ.अफशान कौरी, वृंदा गवंडळकर,गौरी मराठे,श्रिया परब,आरती गिरप आदी उपस्थित होत्या.डॉ.पूजा कर्पे यांनी सूत्रसंचालन केले व सचिव स्मिता दामले यांनी क्लबच्या कार्याचा आढावा घेतला व आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा