You are currently viewing महिला मोर्चा भाजपा साजरा करणार “समर्थ बुथ – रक्षाबंधन “जिल्ह्यातील ९१६ बुथवर करणार रक्षाबंधन कार्यक्रम..

महिला मोर्चा भाजपा साजरा करणार “समर्थ बुथ – रक्षाबंधन “जिल्ह्यातील ९१६ बुथवर करणार रक्षाबंधन कार्यक्रम..

भाजपच्या महिला जिल्हाध्यक्ष| सौ.संध्या तेरसे यांची संकल्पना..

कुडाळ /-

भाजपा महिला मोर्चाच्या वतीने दरवर्षी मोठ्या उत्साहात रक्षाबंधन सण साजरा करण्यात येतो.मागिलवर्षी कोविड कालावधी असतानाही सर्व तालुक्यातील भाजपाच्या महिलांनी सर्व कोविड नियम पाळत कोविड योद्ध्यांचा गौरव केला होता. याही वर्षी आम्ही संपूर्ण जिल्ह्यातील ९१६ बूथवर रक्षाबंधन सण साजरा करत आहोत .एकाच वेळी ९१६ बुथवर आमच्या महिला भगिनी आपापल्या बुथ वरील निरनिराळ्या स्तरावर सामाजिक भान ठेवत समाजकार्य करत असलेल्या बांधवांना तसेच नुकत्याच झालेल्या वादळ, अतिवृष्टी, पुर यामधे सर्व सामान्यांच्या मदतीला धावून जाणाऱ्या भाजपाच्या बुथ कार्यकर्त्यांपासून भाजपा नेत्यांपर्यत सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व नेहमी आपल्या सर्वांसाठी कार्यरत असलेले पोलिस,आरोग्य कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी, पत्रकार यासर्वांना राखी बांधून त्यांच्या उदंड आणि आरोग्यपूर्ण आयुष्यासाठी कामना करत त्यांना शुभेच्छा देतील.समर्थ बुथ- रक्षाबंधन अंतर्गत आम्ही सर्व ठिकाणी एकाच प्रकारची राखी बांधणार आहेत.

जिल्हयातील सर्व बुथवरील माझ्या महिला सहकारी मोठ्या उत्साहात हा समर्थ बुथ- रक्षाबंधन कार्यक्रम साजरा आहेत त्यासाठी त्या सर्वजणींना मनःपूर्वक शुभेच्छा असे भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष| सौ.संध्या प्रसाद तेरसे यांनी आवाहन केले आहे.

अभिप्राय द्या..